
मराठी भाषा गौरव दिन २०२५
दि. २४ फेब्रु. २०२५,
मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस ज्ञानपीठ पुरस्कार विजेते नाशिकचे प्रसिद्ध आणि ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मराठी भाषेच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मराठी भाषेचे संवर्धन आणि प्रचार करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. मराठी भाषेला अभिमत भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. मराठी हि भारतातील प्रमुख भाषा असून अधिकृत भाषा आहे. या भाषेचा समृद्ध साहित्यिक वारसा लाभलेला आहे. मराठी भाषा गौरव दिन २०२५ हा कार्यक्रम दि. २४ फ़ेब्रु. २०२५ रोजी कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक आणि ग्रंथ तुमच्या दारी, यू ए ई विभाग यांच्या वतीने अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यानुसार रात्री ९ ते १० भारतीय वेळ यावेळी झूम मिटींगद्वारे, एक सिद्धहस्त लेखक व प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. मनोज भाटवडेकर यांनी दुबई वरून सर्वांशी संवाद साधला. यावेळी एकूण ११० सदस्य सहभागी झाले होते. यावेळी संदीप विद्यापीठीय ग्रंथालयाचे ग्रंथपाल आणि ग्रंथालयातील सर्व सदस्य ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. यामध्ये डॉ. भाटवडेकर यांनी एमडी झालेला मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशक यातील फरक सांगितला आणि त्यासाठी काही उदाहरणादाखल घडून आलेल्या गोष्टी पण सांगितल्या. त्यांची ओघवती भाषा असल्यामुळे ते सर्व ऐकायला छान वाटत होते. मानसोपचार म्हणजे नेमके काय ? त्याचा कसा उपयोग होतो, पूर्वीचा लोकांचा याबाबतीतला समज, गैरसमज आणि समाजाची आताची गरज यावर त्यांनी खूप सुंदर भाषेत विवेचन केले. योगा केल्याने काय फायदा होतो ? आणि त्याकडे ते कसे वळले, हे त्यांनी संधिवात झाल्यानंतर ज्या घडामोडी घडून आल्या व त्यांचे गुरु प्रसिद्ध कवी व गीतकार श्री. यशवंत देव यांनी केलेल्या सूचना आणि त्यातून घडून आलेले योगाचे प्रात्यक्षिक आणि तब्यतीमध्ये औषधाने ज्या गोष्टी घडत नव्हत्या त्या योग कार्यशाळेच्या पाचव्या दिवशी नकळतपणे व्ह्यायला लागलेला तब्येतीमधील बदल असे बरेच काही शिकवून गेला. हे त्यांनी ज्या पद्धतीने समजावून संगितले की, एक तास कधी संपला हेच मुळात समजून आले नाही. कार्यक्रमाचा शेवट सहभागी सदस्यांच्या प्रश्नोत्तरांतून झाला. काहींनी खूप सुंदर प्रतिक्रिया नोंदवली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती स्नेहल देशपांडे यांनी केले तर आभारप्रदर्शन श्रीमती आरती आडके यांनी केलं. सर्वात शेवटी नाशिकचे कुसुमाग्रज प्रतिष्ठान व ग्रंथ तुमच्या दारी चे सर्वोसर्व श्री. विनायक रानडे यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आणि कार्यक्रमाची सांगता झाली.